दिनांक ९ जुलै २०२३ रोजी दलित पॅंथरच्या ५० वा सुवर्ण महोत्सवानिमीत्त मीरा रोड येथे पॅंथरच्या सन्मान व सत्कार समारंभ

रिपॉर्ट_ भारतसिंह ठाकोर गुजरात आईटी सेल प्रदेश प्रमुख (ऑल इंडिया एससी एसटी ओबीसी मायनोरीटी महासंघ)

दिनांक ९ जुलै २०२३ रोजी दलित पॅंथरच्या ५० वा सुवर्ण महोत्सवानिमीत्त सन्मान व सत्कार समारंभ मीरा रोड येथे भारतरत्न लता मंगेशकर सभागृह करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव राज्यभर गेली वर्षभर साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक ९ जुलै २०२३ भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह मीरा रोड येथे दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार ) मा रामदास आठवले , उत्तर मुंबई जिल्ह्याचे खासदार मा गोपाल शेट्टी, तसेच आमदार मा प्रताप सरनाईक, मिरा भाईंदर चे आमदार मा गीता जैन, या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले च्या हस्ते दलित पॅंथर संघटनेला दिलेले योगदान बदल त्या लडाकु पॅंथरला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले आणि गुजराती समाजाचे नेते मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्री आलजीभाई मारू यांना पॅंथर पुरस्कार , सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन मिरा-भाईंदर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर , उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केले होते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीय नेते सुरेश बारशिंग, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, मिरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष चंद्रमणी मनवर, राष्ट्रीय महिला सचिव आशाताई लांडगे, गुजरात निरीक्षक राष्ट्रीय सचिव जतीन भाई भुत्ता,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सोना कांबळे, पॅंथर नेते आत्माराम बाविस्कर,दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे , मुंबई प्रदेश युवा सचिव नरेश भाई मारू, दिनेश सोलंकी, वेलजी भाई मारू, संतोष मारू, गंगाधर सुखटणकर, आदि मान्यवर या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *